हिंगणघाट शहरातील आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हाध्यक्ष संजय गाते प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मंडळ अध्यक्ष, महामंत्री तसेच सेवा पंधरवाडा संयोजक व सहसंयोजक यांची महत्त्वपूर्ण चर्चात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत तसेच सेवा पंधरवाडा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.