शहरातील निमझरी नाका परिसरात दीप दातांचा दवाखान्यात अज्ञात माथेफिरू चोरट्याने चोरी करून शौच व लघुशंका केल्याचा प्रकार सकाळी उघडली आला.सदर चोरट्याचे कारनामे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.शहरातील निमझरी नाका परिसरात 15 दिवसांपासून अशा प्रकारच्या सलगपणे घडणाऱ्या चोरीच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.