सांगोला- चिंचोली रोडवरील लोहार वस्ती येथे भरधाव दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थ्यांसह तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमीपैकी एकाचा उपचारादरम्यान सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान सांगली येथील खाजगी रुग्णालयात एकावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे तर शालेय विद्यार्थ्याचे दोन्ही पाय फॅक्चर झाल्याने त्याच्यावर सांगोल्यात उपचार सुरू आहेत.