आगामी सिनेमाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री जानव्ही कपूर व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी शिर्डीला भेट देत साईबाबांचे समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आहे. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांनाच्या वतीने प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले यांनी त्यांचा सत्कार केलाय.यावेळी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे हेही उपस्थित होते. अशी माहिती आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कळली.