प्रभाग क्रमांक एक मध्ये महापालिकेचा कचरा डेपो असल्यामुळे स्थानिक नागरिकांना दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होता याबाबत नागरिकांच्या मागणीनुसार वारंवार निवेदन आणि आंदोलन करण्यात आली आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने कचरा डेपो हटवला त्यामुळे या परिसरात विकासाला नवी दिशा मिळाली असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केला आहे लक्ष्मी नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ यावेळी संपन्न झाला