दिनांक 22 ऑगस्ट ला बैलपोळा सण साजरा केल्यानंतर आज दिनांक 23 ऑगस्टला यवतमाळ जिल्ह्यात विविध ठिकाणी तान्हा पोळा पार पडला.यावेळी चिमुकल्यांनी अतिशय उत्साहाने बैल बनवून तान्हा पोळ्यामध्ये आणले. यावेळी पंच कमिटी कडून चिमुकल्यांना बक्षीस दिल्यानंतर त्यांचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची वेशभूषा धारण करून तान्हा पोळ्यामध्ये आपली बैल जोडी आणली होती.एकंदरीत जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिशय उत्साहात तान्हा पोळा पार पडला.