आमगाव पोलिस ठाणे हद्दीतील वाघ नदीच्या पुलावर दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार युवक गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजता घडली.सहेसलाल पोटेलाल लिल्हारे (४८, रा. परसवाडा, जि. बालाघाट) हे खत घेण्यासाठी आमगाव येथे आले होते. खत विक्रेत्याने मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना खत देऊ शकत नसल्याचे सांगितल्याने ते सायकलने परत आपल्या गावाकडे जात होते. दरम्यान, वाघ नदी पुलाजवळ त्यांना दुचाकी क्रमांक एमएच ३५-एयू ४९१० ने मागून जोरदार धडक दिली. या धड