नगर-मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका ५० वर्षीय महिलेचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली. आज सदर महिलेचा अंत्यविधी झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अचानक नगर-मनमाड महामार्गावर सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान चक्काजाम आंदोलन करून संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवताचा गुन्हा दाखल करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केले.