उदगीर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले असून बहुजन विकास अभियान संघटना आंदोलनाचा इशारा दिला आहे,सामान्य रुग्णालयात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने रुग्णांवर याचा मोठा परिणाम होत आहे, रुग्णालयातील व परिसरातील घाण संबंधित प्रशासनाला का दिसत नाही का असा सवाल बहुजन विकास अभियानाच्या वतीने करण्यात आला शासकीय रुग्णालयात ही अवस्था असेल तर गोरगरिबानी उपचार घ्यावे कसे असा प्रश्न उपस्थित केला, रुग्णालयातील व परिसरातील घाण स्वच्छ करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला