**फडणवीस जाहिरातीवरून पेटले आरोप-प्रत्यारोप! सुजय विखेंचा रोहित पवारांना मिश्किल टोला – "गैरसमज दूर करायला वेळ कितीसा लागतो?"** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातीवरून सुरु झालेल्या वादात आमदार रोहित पवार आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप चांगलेच रंगले आहेत. यावर आता खासदार सुजय विखेंनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला आहे. "रोहित पवार ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, त्यांचे झालेले गैरसमज आम्ही दूर करून टाकू. ते देखील या जिल्ह्याचे आमदार आहेत आणि आम्हीदेखील याच जिल्ह्यात आहोत.