दिंडोरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती संलग्न असलेल्या वणी उपबाजार समितीत कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .कांदा काढण्याच्या वेळेस ओल्या कांद्याला पंधराशे ते सतराशे रुपये प्रतिक्विंटरला भाव होता . चार महिने कांदे साठवण करून आज कांद्याला 700 ते हजार रुपये पर्यंत बाजार मिळत असल्याने शेतकरी नाराज झाला आहे शासनाने लक्ष घालून हमीभाव जाहीर करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे .