अल्पवयीन काॅलेज तरुणीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी सदर आरोपीची तपासाच्या अनुषंगाने शहरातील बाजारपेठेतून पायी दिंडी काढली आहे. सदर आरोपीला तपासकामी पायी फिरवण्यात आल्यामुळे अशा कृत्याबाबत नागरिकांमध्ये पोलीस कारवाईचा वचक बसला आहे.अल्पवयीन कॉलेज तरुणीला सदर आरोपीने फेसबुक इंस्टाग्राम वर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती याबाबत पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे..