तालुक्यातील दहिवडद येथे जुन्या वादातून विनायक उर्फ बारकु काशिनाथ पाटील वय 37 या तरुणाचा संशयीत उमेश उर्फ दादू विश्वनाथ चव्हाण रा दहिवद खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी विनायक पाटील हा युवक मयतावस्थेत आढळून आला होता.संशयीताने त्यास मारहाण केली होती व त्या मारहाणीतुन त्याचा मृत्यू झाल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.