ओबीसींचं आरक्षण संपल्याच्या चिंतेतून तरूणाची आत्महत्या : मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करून ओबीसींचं आरक्षण संपणार असल्याची भीती व्यक्त करत रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत महादेव कराड (वय ३५) या तरुणाने काल (१० सप्टेंबर) सायंकाळी मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. भरत कराड हा ऑटो व्यावसायिक व वाहनचालक असून गेल्या काही वर्षांपासून तो ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर कार्यरत होता.