घराशेजारी राहणाऱ्या 2 महिलांचे भांडण होऊन त्यात एकीने शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. ही घटना ता. 23 शनिवारला सकाळी 10 वाजता केळझर येथे घडली. याप्रकरणी सीमा रंजित मरसकोल्हे वय 25 रा. केळझर यांनी जयश्री गणेश राऊत रा. केळझर हिचे विरुद्ध दुपारी 1.30 वाजता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती ता. 24 ला सेलू पोलिसांनी दिली.