यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय कुमार चिंता सर यांनी यवतमाळ अपडेटशी संवाद साधताना सांगितले की,दिनांक ५ सप्टेंबर रोजी होणारा ईद-ए-मिलाद आणि दिनांक ६ सप्टेंबर रोजी होणारे गणेश विसर्जन हे दोनही सण आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ग्रामीण,शहरी तसेच तालुका आणि जिल्हा पातळीवर पोलीस प्रशासनाने योग्य ती तयारी केली असून,सर्व नागरिकांनी शांतता,एकोपा आणि परस्पर सहकार्य जपत हे उत्सव साजरे करावेत असे...