श्री रेणुकामातेचे अधिष्ठान असलेल्या पिंपळगाव रेणुकाई (ता. भोकरदन, जि. जालना) येथे सात सप्टेंबर रोजी महाराष्ट्र ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. रावसाहेब दानवे यांच्या शुभहस्ते झाले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहून पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी अभिनंदन केले.