विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सिरेगावबांध च्या वतीने मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा गोंदियाच्या नवनिर्वाचित संचालिका तथा जिल्हा परिषद सदस्य सौ. रचनाताई चामेश्वर गहाणे यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.सिरेगावबांध येथील विविध कार्य. सेवा सह.संस्थेची मासिक सभा संस्थेच्या सभागृहात आयोजीत करण्यात आली. त्यावेळी संस्थेच्या वतीने सिरेगावबांध निवासी रचनाताई चामेश्वर गहाणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहर चिमणकर, उपाध्यक्ष धनराज मारवाडे आदी उपस्थित होते.