सजावट करताना लक्ष्मी मूर्तीच्या गळ्यात घातलेले चार तोळे सोन्याचे गंठण अनोळखी व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना बार्शी शहरातील मुळे प्लॉट येथे घडली. गौराईंच्या आगमनानंतर नैवेद्य दाखविताना ही घटना उघडकीस आली. याबाबत पोपट कृष्णात विधाते (वय ५८, रा. मुळे प्लॉट, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली असून घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.