मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर शिवसेनेचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी आज मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. आमच्या सरकारने मराठा बांधवांसाठी लाखो कुणबी प्रमाणपत्रे जारी केली आहेत. न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापनाही करण्यात आली. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १०% आरक्षण देण्यात आले. आमच्या सरकारइतके काम मागील कोणत्याही सरकारने केलेले नाही. आमच्या राज्यात अनेक प्रमुख मराठा नेत्यांनी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षात काम केले आहे, परंतु कोणीही मराठा समाजासाठी काहीही केले नाही.