गडचिरोली पोलिसांचा वासुदेव मडावी यांना गौरव: १०१ माओवाद्यांना कंठस्नान घालणारे 'पार्टी कमांडर' गडचिरोली: माओवादविरोधी लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे पोलीस उपनिरीक्षक वासुदेव राजम मडावी यांचा गडचिरोली पोलीस दलातर्फे गौरव करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या २६ वर्षांच्या सेवेत ५८ चकमकींमध्ये सहभाग घेऊन तब्बल १०१ माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यांच्या या शौर्याबद्दल आणि अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.