घराची पायरी चढत असताना अचानक एका ६५ वर्षीय इसमाचा तोल गेला व तो घरासमोरील सिमेंट रस्त्यावर पडला सिमेंट रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. ही घटना उघडकीस येताच कुटुंबीयांनी त्याला प्राथमिक उपचारासाठी भुयार येथील रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व नंतर नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले. नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू असताना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.