विटा येथे मा. खासदार विशाल दादा पाटील व मा. डॉ. सचिन मोटे साहेब (आयकर उपायुक्त मुंबई) यांनी विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती संपन्न झाली. यावेळी आमदार सुहास (भैय्या) बाबर, मंडळाचे अध्यक्ष व सांगली जिल्हा बँकेचे संचालक अमोल दादा बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, साध्य फाउंडेशन संस्थापिका सौ. विद्याताई सचिन मोटे, पप्पू दाजी कदम, सर्व पदाधिकारी व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते