कौडगाव लमाण तांडा येथे एका व्यक्तीला गैरकायदेशीर जमाव जमवून २० जणांनी मिळून जातीवाचक शिवीगाळ करत काठी आणि कुन्हाडीने जबर मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात २० आरोपींविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विनोद शिवलाल शिंदे (वय ४०) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. अशी माहिती ११ सप्टेंबर वाजता ६ वा पोलिसांनी दिली.