बार्शी शहरातील सुभाषनगर येथे राहणाऱ्या समाधान बालाजी वट्टमवार यांनी विश्वासात घेऊन रेल्वेमध्ये सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवत २७ वर्षीय तरुणाची फसवणूक केली. तब्बल १ लाख ७१ हजार रुपये ऑनलाईन घेऊन खोटा दस्ताऐवज तयार केला. याप्रकरणी श्रीशैल्य कनुरे रा. साई भगवंतनगर बार्शी यांनी या घटनेची नोंद पांगरी पोलीस ठाण्यात केली आहे. याबाबत पांगरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत काटकर यांनी ३१ रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास संवाद साधून नागरिकांना आवाहन केले आहे.