श्री. गुरुदेव स्पोर्टिंग क्लब, कृष्णनगर (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) यांच्या वतीने आयोजित ग्रामीण स्तरीय फुटबॉल स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी खेळाडूंना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्यांनी खेळाडूंच्या जिद्दीचे कौतुक केले.