सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाशी तालुक्यातील विजोरा येथे भगिनी भिराबाई विजयकुमार तळेकर यांनी एक आगळावेगळा देखावा उभारला आहे. या देखाव्यात त्यांनी आझाद मैदानावर सुरू असलेली परिस्थिती हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केला आहे. गौराईसमोर उभारलेला हा सामाजिक संदेश देणारा देखावा गावकऱ्यांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरत आहे. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक प्रश्न यांची सांगड घालत मराठा समाजाच्या मागण्यांचा आवाज