जव्हार येथे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची नियोजन बैठक आयोजित करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार एस.एस.माहेर व पोलीस निरीक्षक जव्हार विजय मुतडक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. याप्रसंगी तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, सरपंच उपसरपंच, नागरिक उपस्थित होते. शांतता, एकोपा, सौंदर्हाचे वातावरण राखत उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले.