दिंडोरी तालुक्यातील वनी येथे जगदंबा मातेचे मुख्य पुजारी सुधीर दवणे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मीचे पूजन करण्यात आले. गौरी गणपती हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो त्याच पद्धतीने डॉक्टर विलास चांडोले यांच्या घरी ही आज महालक्ष्मीचे पूजन करण्यात आले . यावेळेस परिसरातील नागरिक व बाहेर गावाहून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .