फिर्यादी आशिष रमेशराव सोनतापे यांच्यात तक्रारीनुसार 26 ऑगस्टला फिर्यादी हे मार्केटमध्ये सामान खरेदी करून घराकडे ऑटो मध्ये बसून असताना त्यांचा 17999 रुपयाचा मोटो कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने हातचलाखीने चोरून नेला. याप्रकरणी 29 ऑगस्टला अवधूतवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.