बुलढाणा शहरातील प्रभाग क्र. १, कऱ्हाळे ले-आऊट परिसरातील असंख्य नागरिक तसेच माता-भगिनींनी येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेणुका माता मंदिराच्या विकासासाठी ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता आमदार संजय गायकवाड यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी क्षणाचाही विलंब न लावता रेणुका माता मंदिर सभामंडपाकरिता तात्काळ ₹१० लाख रुपयांच्या निधीची घोषणा करून जनतेच्या अपेक्षांना उत्तरे दिली.