एमआयडीसी परिसरातून पोलिसांनी चोरी करणाऱ्या अवैधरित्या दारू बाळगणाऱ्या, तसेच मकोका अंतर्गत सराईत गुन्हेगारांना, 24 तासाच्या आत अटक केले आहे. पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या ताब्यातून एक लाख 38 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.