माहुर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पवित्र शक्तिपीठ आहे.शिवाय येथे विविध धर्मियांची पवित्र प्राचीन प्रार्थनास्थळे,प्राचीन किल्ला,लेण्या आहेत.अशाच उमरखेड आगाराद्वारे माहूर येथे ढाणकी मार्गे जाण्यासाठी बस नव्हती.ज्यामुळे ढाणकी शहराला लागून असणारी जवळपास पन्नास खेड्या पाड्यातील प्रवाशांना खाजगी व इतर वाहनाने उमरखेड मार्गे लांब पल्ल्याचा आणि वेळेचा प्रवास करीत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.