सप्टेंबर महिन्यात भव्य स्वरुपात जिल्हास्तरीय देवाभाऊ महा जनआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांनी नियोजनाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांना शिबिराचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी आतापासूनच तयारीला लागावे. गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी शिबिर महत्वाचे ठरणार असून आरोग्य विभागासह इतरही विभागाने रुग्णसेवेच्यादृष्टीने काम करावे, असे यावेळी प्रा.डॉ.वुईके यांनी सांगितले.