विविध सेवा सहकारी संस्था कटंगी या संस्थेची वार्षिक आमसभा दि.9 सप्टेंबर रोजी मंगळवारला दुपारी उत्साहात संपन्न झाली. ही सभा अंकुश बघेले अध्यक्ष सेवा सहकारी संस्था कटंगी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेमध्ये प्रमुख उपस्थिती योगेश हरिणखेडे उपाध्यक्ष, ए. बी. पटले गटसचिव, संस्थेचे सर्व संचालक, संस्थेचे सर्व सभासद व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. ही सभा रेखलाल टेंभरे माजी संचालक को-ऑपरेटिव बँक गोंदिया यांच्या निवासस्थानी कटंगी बुजरूक येथे घेण्यात आली.