राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या धर्माडी गेस्ट हाऊस समोर नगर-मनमाड महामार्गावर आज शुक्रवारी सकाळी एका रस्ते अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शशिकांत दुधाडे असे मृताचे नाव असून रस्त्याच्या खड्ड्यात गाडी आढळल्याने त्यातच त्यांचा अपघात झाला व त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला आहे.