आज रविवारी दुपारी २ च्या सुमारास उबाठाच्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यापासून महाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही, रोज विविध गावांतील शेकडो महिला भगिनी कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. किल्ले रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या छत्री निजामपूर मधील शेकडो ग्रामस्थ महिला भगिनींनी शिवसेनेत आज कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश समारंभावेळी विभागातील युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.