नालासोपारा पश्चिम परिसरातील निळेमोरे गावानजीक दरड कोसळण्याची घटना घडली आहे. निळेमोरे गावानजीक असलेल्या डोंगरावरून अचानक दरड खाली कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल, महानगरपालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले, दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. दरड कोसळण्याची घटना घडली त्यावेळी नागरिक आसपास नसल्याने दुर्घटना टाळली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.