सोलापूर शहरातील रूपा भवानी रोडवर असलेल्या महर्षी वाल्मिकी सांस्कृतिक भावनाच्या कामासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी ₹ ५० लाख रुपयांचा निधी देण्याचा जाहीर केला आहे. सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब हिप्परगे यांनी मंगळवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, महर्षी वाल्मिकी सांस्कृतिक भावनाला माजी महापौर स्व. महेश कोठे यांनी अनेक वर्षे भरभरून योगदान दिले. मात्र, त्यांच्या निधनानंतर सांस्कृतिक भावनातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प प्रलंबित राहिले होते.