काही दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिका मध्ये तळोजा भागात होणारी दुर्दशा तसेच रस्ता ,घनकचरा यामुळे होणारे आरोग्यावर दुष्परिणाम त्यामुळे पनवेल महानगरपलिकेत आयुक्त चितळे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष शहबाज फारुक पटेल यांनी भेटून निवेदन दिले होते. आज बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास भागाची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आले होते. लवकरच रस्ते, घनकचरा या समस्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.