दिवा येथील समाजसेवक अमोल केंद्रे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर ३ हजार मराठा आंदोलकांना मदत केली असल्याची माहिती आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास देण्यात आली आहे. केंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठा आंदोलकांना जेवणाची सोय केली आहे. वंजारी समाजाचे असलेले केंद्र यांनी जाती-पातीचे राजकारण बाजूला ठेऊन आंदोलकांसाठी जेवणाची सोय केली आहे. ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांची आहे.