Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Oct 6, 2025
बाजार सावंगी व परिसरातील नागरिकांनी आपल्या दैनंदिन बचतीतून आदर्श पतसंस्थेत ठेवी ठेवून विश्वास दाखवला होता. मात्र काही महिन्यांपूर्वीच संस्थेने अचानक आपली कामकाजे गुंडाळल्याने ठेवीदारांचे लाखो रुपये अडकून पडले आहेत. सध्या संस्थेकडून फक्त ५० हजार रुपये परत दिले जात असल्याने ठेवीदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ठेवीदारांनी सरसकट प्रत्येकी एक लाख रुपये परत मिळावेत, अशी मागणी केली आहे