बैल पोळ्यानिमित्त वाशिम शहरातून आज दि. 22 ऑगस्ट रोजी दुपारी विविध आभूषणाने सजविलेल्या बैल जोड्यांची ढोल ताशांच्या निनादात मिरवणूक काढून बैल पोळा सण साजरा करण्यात आला. यावेळी बैलांचे पूजन व शेतकर्यांचा सन्मान करण्यात आला. शहरातून काढण्यात आलेली ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलिस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.