मालवाहु ट्रकला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ट्रक चालक जागीच ठार झाला. ही घटना १२ सप्टेंबरच्या देऊळगाव मही येथे रात्री घडली. याप्रकरणी १३ सप्टेंबरला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागेश लक्ष्मण दहियाळे रा. आनंदवाडी ता. शिरूर कासार जिल्हा बीड असे मृतकाचे नाव आहे.