जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वांगी येथे ग्राम महसुल अधिकारी मोनिका सोनुने यांनी शिवार फेरी करून प्रत्यक्ष स्थळावर रस्त्याची पाहणी केल्याची माहिती दि. 13 सप्टेंबर रोजी दिली. यावेळी मा सरपंच बालाजी भोयर, सतीश भोयर, पोलिस पाटील माधव भोयर, पांडुरंग भोयर, नामदेव झाटे, यांच्यासह शेतकरी या शिवार फेरीमध्ये सहभागी झाले होते.