दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या धडाकेबाज कार स्टंटबाजीचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे. कार रेसिंग आणि स्टंट करताना भर समुद्रात गाड्या वेगाने फिरताना आणि एकमेकांभोवती फेऱ्या मारताना पाहायला मिळाल्या. ही गाड्या मारुती स्विफ्ट डिझायर असून, एमएच १२ टूरिस्ट परमिट गाडी आहेत.