राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज गुरुवार, दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता शिरूर कासार तालुक्यातील पावसामुळे उध्वस्त झालेल्या भागांचा दौरा केला. मुसळधार पावसामुळे शेती, घरे आणि रस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांनी प्रत्येक्ष पाहणी करुन, नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या.या प्रसंगी अजित पवार यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून पीडितांना मदतीचे हात द्यावेत, शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर व्हावी आणि नागरिकांच्या अडचणी दूर करण्यास