सोलापूरकरांचे आयटी पार्कचे स्वप्न बोरामणीत साकार व्हावे, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य धनेश सुभाष आचलारे यांनी गुरुवारी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. बोरामणी विमानतळासाठी ६०८ हेक्टर जागा अधिग्रहीत असून त्यातील ४०-५० हेक्टर जागा आयटी पार्कसाठी वापरता येऊ शकते. विमानतळासाठीची वनीकरण विभागाची ३३ हेक्टर जमीन उपलब्ध होत नसल्याने प्रकल्प रखडला आहे. अशा परिस्थितीत त्यातील एक भाग आयटी पार्कसाठी देणे शक्य असल्याचे आचलारे यांनी म्हटले आहे.