29 ऑगस्ट ला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, जयताळा हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये पीडित व्यक्तीने त्याच्या पत्नीने त्याच्या आई-वडिलांना प्रॉपर्टीसाठी प्रताडित केले असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये चैतन्य नावाच्या सामाजिक संस्थेने मध्यस्थी केल्याने या परिवाराला न्याय मिळाला आहे. एरवी सुनेला सासू सासरे हुंड्यासाठी प्रताडीत करत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. परंतु या घटनेमध्ये चक्क सुनेने सासू-सासर्यांना प्रताडीत केले आहे.