शहरातील प्रमुख व्यापारी बाग असलेल्या इतवारी गांधीबाग परिसरात कायमस्वरूपी लागणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर शहरात साजरे होणारे सण उत्सव पाहता 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत ऑटो, ई रिक्षा, चार चाकी तसेच जड वाहनांना या भागात प्रवेश बंदी राहणार आहे यावेळी फक्त दोन चाकी वाहने आणि पादचारी यांनाच प्रवेश दिला जाईल.